मंगळुरू (कर्नाटक) येथे भर रस्त्यात नमाजपठणामुळे वाहतुकीला अडथळा
मंगळुरू (कर्नाटक) – कंकनाडी येथे सकाळच्या वेळी वाहनांची रहदारी वाढलेली असतांना अनेक मुसलमान युवकांनी येथील मशिदीसमोरील रस्त्यावर मध्येच बसून नमाजपठण केले. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. ही घटना २ दिवसांपूर्वी घडली असून सामाजिक माध्यमांतून त्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. ‘नमाजासाठी मशीद असतांना तिथे न जाता भर रस्त्यात बसून नमाजपठण केल्यास वाहने कशी चालवायची ?’, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
संपादकीय भूमिकाही स्थिती संपूर्ण देशांत असतांना यावर स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांत कारवाई करण्यात आली नाही आणि येत नाही, हे लज्जास्पद ! |