Papua New Guinea Landslide : पापुआ न्यू गिनीमधील भूस्खलनात ६७० जणांचा मृत्यू झाल्याची भीती
पोर्ट मोरेस्बी (पापुआ न्यू गिनी) – प्रशांत महासागरातील बेटांचा देश असलेल्या पापुआ न्यू गिनीमध्ये भूस्सखलनात ६७० जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. एंगा प्रांतातील काओकलाम गावात २४ मेच्या पहाटे भूस्खलन झाले होते. येथे दरड कोसळून त्याखाली १५० हून अधिक घरे दबली गेली होती. त्यामध्ये ६७० लोक अडकले होते. या सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
More than 2,000 feared dead in Papua New Guinea as landslide hits a remote area.
Search and rescue efforts are on
‘Deeply Saddened By the loss of lives In Papua New Guinea Landslide’ – EAM Dr. S Jaishankar
pic.twitter.com/Hg0MIYUyjX— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 27, 2024
ढिगार्याखाली अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठीही बचाव कर्मचार्यांना प्रतिकुल परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. आतापर्यंत ढिगार्याखालून ६ ते ७ मृतदेहच बाहेर काढण्यात आले असून मृतांचा आकडा मोठ्या संख्येने वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.