Nepal Infiltrators : नेपाळमधील प्राचीन मंदिराच्या भूमीवर घुसखोर रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान यांच्याकडून अतिक्रमण
काठमांडू (नेपाळ) – नेपाळच्या मोहतारी जिल्ह्यात घुसखोर रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान यांनी येथील प्राचीन श्री लक्ष्मीनारायण मठ नावाचे मंदिर कह्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप हिंदु संघटनांकडून करण्यात आला आहे. नेपाळमधील सर्वांत मोठा मठ, असे म्हटले जाणारे हे मंदिर शेकडो वर्षे जुने आहे.
मंदिराच्या भूमीवर बेकायदेशीर बांधकाम करण्याचा प्रयत्न
घुसखोर मुसलमानांनी मंदिराच्या भूमीवर तात्पुरत्या झोपड्या उभारण्याचा कट रचला आणि नंतर त्यांना आग लावली, असे सांगण्यात येत आहे. परिसरात रहाणार्या काही हिंदु कुटुंबांच्या घरांनाही आगीचा फटका बसला आहे. आता तेथे कायमस्वरूपी बांधकाम करण्याची सिद्धता चालू आहे. नेपाळ आणि परदेशातील अनेक इस्लामी संघटना या बांधकामासाठी पैसे देत आहेत. याला विरोध झाल्यावर प्रशासनाने हे बांधकाम थांबवले आहे.
२० वर्षांपूर्वी चालू झाली घुसखोरी !
अनुमाने २० वर्षांपूर्वी मंदिराच्या मोकळ्या जागेवर घुसखोर मुसलमानांनी तात्पुरत्या झोपड्या बांधल्या.आरंभी काही घुसखोर कुटुंबे येथे तंबूत रहात होती. काही काळानंतर वसाहतीतील घुसखोरांनीनी तंबूऐवजी झोपड्या उभ्या केल्या आणि तीच जागा स्वतःचा तळ म्हणून घोषित केली. येथे भंगार इत्यादींचे काम चालू झाल्यानंतर ते भाजीपाला आणि फळे यांचाही व्यवसाय चालू केला.
राजकीय पक्षांकडून घुसखोरांना संरक्षण
मंदिर प्रशासनाने या घुसखोरांना अनुमाने वर्षभरापूर्वी भूमी रिकामी करण्याची नोटीस दिली होती; परंतु या नोटिसीचा कुठलाही परिणाम झाला नाही. काही राजकीय पक्षांनीही घुसखोरांना संरक्षण दिल्याचा आरोप आहे. या परिसरात चोरीआणि तस्करी यांसारख्या घटनाही वाढल्या आहेत. एप्रिल २०२४ मध्ये घुसखोरांच्या या झोपडपट्टीत संशयास्पद आग लागली होती. आगीत सर्व ८० झोपड्या जळून खाक झाल्या. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आगीनंतर घुसखोरांना कायमस्वरूपी घरे देण्याचा डाव हिंदु संघटनांनी उधळला !
आग लागल्यानंतर या मुसलमानांना साहाय्य करण्याचे आवाहन करण्यात आले. यात पहिली मागणी ८० हून अधिक घुसखोर मुसलमान कुटुंबांना कायमस्वरूपी घरे देण्याची होती. ही साम्यवादी पक्षांनी सरकारपर्यंत पोचवली. यानंतर मंदिर व्यवस्थापनाने नेपाळ प्रशासनाला मंदिराची भूमी वाचवण्याचे आवाहन केले. मे २०२४ पासून हिंदु सम्राट सेना आणि इतर अनेक हिंदुत्वनिष्ठ गटांनी घुसखोरांना कायमस्वरूपी घरे देण्याच्या विरोधात गावोगावी आणि शहरातून शहरापर्यंत मोहिमा चालू केल्या. नेपाळ सरकार आणि स्थानिक प्रशासन यांना निवेदनही देण्यात आले. ‘मंदिराच्या भूमीवर अतिक्रमण झाल्यास आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणी दिली. वाढता तणाव पाहून नेपाळ सरकारने पक्की घर बांधण्याचे काम थांबवले आहे.
श्री लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये आहे नेपाळमधील पहिले गुरुकुल !श्री लक्ष्मीनारायण मंदिर सहस्रो चौरस मीटरमध्ये पसरले आहे. मंदिराच्या आत एक गुरुकुलदेखील आहे. यामध्ये जगभरातील शेकडो विद्यार्थी संस्कृत आणि सनातन पद्धतीने शिक्षण घेतात. या मठात नेपाळमधील पहिले गुरुकुल स्थापन झाल्याचे मानले जाते. मठात गोठाही आहे. प्रतिवर्षी लाखो हिंदू येथे प्रदक्षिणा आणि जत्रा यांत सहभागी होतात. |
संपादकीय भूमिकाघुसखोरांमुळे नेपाळमध्ये बहुसंख्य असलेले हिंदु अल्पसंख्यांक झाल्यास आश्चर्य वाटू नये ! |