सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त साजरा करण्यात आलेल्या ‘ब्रह्मोत्सव’ संदर्भातील संशोधन !
‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सप्तर्षींच्या आज्ञेनुसार वर्ष २०१५ पासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येत आहे. सप्तर्षींच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी यापूर्वी झालेल्या त्यांच्या जन्मोत्सव सोहळ्यांत श्रीराम, श्रीकृष्ण, श्रीविष्णु आणि श्रीसत्यनारायण या देवतांच्या रूपांत (वेशभूषेत) साधकांना दर्शन दिले. महर्षींच्या आज्ञेने ११.५.२०२३ या दिवशी फर्मागुडी, गोवा येथे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त त्यांचा ‘ब्रह्मोत्सव’ साजरा करण्यात आला. यासंदर्भात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’या उपकरणाद्वारे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन करण्यात आले आहे. या संशोधनापैकी ब्रह्मोत्सवात कलाकार-साधक अन् साधिका यांनी भावपूर्ण सादर केलेल्या गायन-वादन-नृत्य यांमुळे, तसेच ब्रह्मोत्सवातील चैतन्यामुळे त्यांच्यावरील त्रासदायक स्पंदनांचे आवरण अल्प होऊन त्यांच्यातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ वाढ होणे, याविषयीचे संशोधन येथे दिले आहे.
१. ब्रह्मोत्सवात संगीताचा कार्यक्रम सादर करणारे कलाकार-साधक अन् कलाकार-साधिका यांच्यावर तेथील चैतन्याचा सकारात्मक परिणाम होणे
ब्रह्मोत्सवात कलाकार-साधक अन् साधिका यांनी भावपूर्ण सादर केलेल्या गायन-वादन-नृत्य यांमुळे, तसेच ब्रह्मोत्सवातील चैतन्यामुळे त्यांच्यावरील त्रासदायक स्पंदनांचे आवरण अल्प होऊन त्यांच्यातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ वाढ झाली.
२. ब्रह्मोत्सवाला प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेले संत अन् साधक, तसेच ‘ऑनलाईन’ पहाणारे संत अन् साधक यांना ब्रह्मोत्सवातील चैतन्याचा पुष्कळ लाभ होणे
काही राज्यांतून अनेक साधक-साधिका अनेक किलोमीटर प्रवास करून हा सोहळा प्रत्यक्ष पहाण्यासाठी गोवा येथे आले होते. तसेच विविध राज्यांतील सनातनच्या सहस्रो साधकांनी हा सोहळा ‘ऑनलाईन’ पाहिला. ब्रह्मोत्सव सोहळा पाहिल्याचा संत अन् साधक यांच्यावर काय परिणाम होतो, हे अभ्यासण्यात आले. यातून लक्षात आले की, सर्वांनाच ब्रह्मोत्सवातील चैतन्याचा पुष्कळ प्रमाणात लाभ झाला. ब्रह्मोत्सवात रथात विराजमान तीनही गुरूंना पाहून संत अन् साधक भावविभोर झाले. सर्वांचे अवघे जीवन कृतार्थ झाले. सनातनचे संत गुरुकार्यासाठी सतत कार्यरत असतात. या कार्यात अडथळे निर्माण करण्यासाठी सूक्ष्मातील अनिष्ट शक्ती त्यांच्यावर आक्रमण करतात. या सूक्ष्मयुद्धाचा तात्कालिक परिणाम म्हणून त्यांच्याभोवती त्रासदायक स्पंदने निर्माण होतात. ब्रह्मोत्सवात तीनही गुरूंकडून प्रक्षेपित झालेले चैतन्य त्यांनी ग्रहण केल्याने त्यांच्यावरील आवरण अल्प किंवा नष्ट होऊन त्यांच्यातील चैतन्यात पुष्कळ वाढ झाली. हे पुढे दिलेल्या २ सारण्यांतील निरीक्षणांतून लक्षात येते.
२ अ. ब्रह्मोत्सवाला प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेले संत, सद्गुरु अन् साधक
ब्रह्मोत्सवातील विविध सेवांमध्ये सहभागी झालेल्या साधकांना सेवेतून पुष्कळ चैतन्य मिळणे
सनातनचे साधक तन-मन-धनाचा त्याग करून सतत सेवारत असतात. सेवा म्हणजे जणू त्यांचा श्वास झाला आहे. ब्रह्मोत्सवाचा सोहळा अविस्मरणीय व्हावा, यासाठी साधक सतत सेवारत होते. काही साधक तर ब्रह्मोत्सवापूर्वी ४-५ दिवस अविश्रांत सेवा करत होते. या साधकांनी केलेल्या भावपूर्ण सेवेमुळे त्यांना सेवेतून पुष्कळ चैतन्य मिळाले. त्यामुळे त्यांच्यावरील काळ्या शक्तीचे आवरण अल्प होऊन त्यांची सात्त्विकता पुष्कळ वाढली.
२ आ. ब्रह्मोत्सव सोहळा आश्रमांत ‘ऑनलाईन’ पहाणारे संत, साधक अन् साधिका
३. ब्रह्मोत्सवातील चैतन्याचा वातावरणावर झालेला पुष्कळ सकारात्मक परिणाम
ब्रह्मोत्सवातील चैतन्याचा वातावरणावर काय परिणाम होतो, हे अभ्यासण्यासाठी भारतातील विविध राज्यांतील सनातनचे आश्रम निवडण्यात आले. या अभ्यासातून लक्षात आले की, ब्रह्मोत्सवातील चैतन्याने सर्वत्रच्या वातावरणावर (माती, पाणी, वायुमंडल या सर्वांवरच) पुष्कळ सकारात्मक परिणाम झाला. यातून ब्रह्मोत्सवाचे माहात्म्य लक्षात येते.
३ अ. ब्रह्मोत्सवातील प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळीचे वातावरण
३ आ. ब्रह्मोत्सवातील चैतन्यामुळे कार्यक्रम स्थळाच्या मैदानात पुष्कळ सकारात्मक परिणाम होणे
एकूण ३ टप्प्यांत मैदानाची छायाचित्रे काढून त्यांच्याही चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणांतून लक्षात आले की, ब्रह्मोत्सवातील चैतन्यामुळे कार्यक्रम स्थळाच्या मैदानावर पुष्कळ सकारात्मक परिणाम झाला.
३ इ. ब्रह्मोत्सव सोहळा ‘ऑनलाईन’ पहाण्यात आलेल्या आश्रमांतील वातावरण
एकूणच या संशोधनातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त साजर्या करण्यात आलेल्या ‘ब्रह्मोत्सवा’चे आध्यात्मिक महत्त्व लक्षात येते. या संशोधनाच्या सेवेत आम्हा साधकांना सहभागी होण्याची संधी मिळाली, यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१.७.२०२३)
इ-मेल : mav.research2014@gmail.com
वाचकांसाठी सूचना : या लेखात दिलेल्या सारण्यांत काही घटकांतील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’या उपकरणाद्वारे मोजतांना ती २३३७ मीटरपेक्षाही अधिक होती; पण ती पूर्ण मोजण्यासाठी पुढे जाणे जागेच्या अभावामुळे शक्य नव्हते. त्यामुळे त्या घटकांतील सकारात्मक ऊर्जा अचूक मोजण्यासाठी ती लोलकाने मोजण्यात आली. |
|