Most Wanted Maoist Karnataka Employee : ७ पोलिसांची हत्या करणारा माओवादी निघाला बेंगळुरू महानगरपालिकेचा कर्मचारी !
|
तुमकुरु (कर्नाटक) – वर्ष २००५ मध्ये तुमकुरु जिल्ह्यात असलेल्या पावगड तालुक्यात एक भीषण घटना घडली होती. येथील वेंकटम्मनहळ्ळीमध्ये ३०० माओवाद्यांनी एका पोलीस चौकीवर आक्रमण करून ७ पोलिसांना ठार मारले होते. यांपैकी ‘मोस्ट वाँटेड’ नक्षलवाद्यांपैकी एक असलेला कोत्तगेरे शंकर हा बेंगळुरू महानगरपालिकेत कर्मचारी असल्याचे कळाल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तो पालिकेच्या कचरा गाडीवर चालक म्हणून काम करत होता.
The Maoist who killed 7 policemen in 2005, turns out to be an employee of Bengaluru Municipal Corporation #BBMP
Police decoy and arrest the maoist.
👉 It is shameful for the Karnataka State police to have such a dreaded Maoist at loose for the past 19 years.
The fact that he… pic.twitter.com/0lvZXw83Yr
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 26, 2024
वर्ष २००५ मध्ये झालेल्या आक्रमणात ७ पोलीस मारले होते, तर ५ जण घायाळ झाले होते. या वेळी माओवादी सरकारी बंदूका आणि बंदुकीच्या गोळ्या लुटून पसार झाले. या प्रकरणी ३२ जणांवर आरोप निश्चिती करून त्यांचा शोध घेतला जात आहे. शंकरची माहिती मिळताच तुमकुरू जिल्हा पोलीस अधिकारी के.व्ही. अशोक यांच्या नेतृत्वाखालील गटाने सापळा रचून त्याला जेरबंद केले.
संपादकीय भूमिकाअशा माओवाद्याविषयी पोलिसांना माहिती न मिळणे आणि तो १९ वर्षे हाती न लागणे, हे कर्नाटक पोलिसांसाठी लज्जास्पद ! कुख्यात माओवादी एवढी वर्षे महानगरपालिकेत कार्यरत होता, ही गोष्ट त्याहून गंभीर आहे. यामागे कोणत्या प्रशासकीय अधिकार्यांचे हात आहेत का ?, याचेही अन्वेषण झाले पाहिजे ! |