Karnataka CAA Applications : ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’च्या अंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी कर्नाटकातून १४५ अर्ज प्राप्त !
बेंगळुरू – ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’च्या (‘सीएए’च्या) अंतर्गत कर्नाटकातून एकूण १४५ लोकांनी भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी अर्ज केले आहेत. रायचूर येथून १४३, तर दक्षिण कन्नड येथून २ अर्ज आले आहेत. यांमध्ये सर्वाधिक लोक हे पाकिस्तानमधून आलेले हिंदू आहेत.
पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथून ३१ डिसेंबर २०१४ च्या आधी आलेले हिंदू, शीख, ख्रिस्ती, जैन आणि पारसी यांना ‘सीएए’च्या अंतर्गत भारतीय नागरिकत्व देण्यात येत आहे.
११ मार्च २०२४ पासून भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्यानंतर अधिसूचना काढण्यात आली होती. पोस्ट आणि रेल्वे कर्मचार्यांना प्रमाणपत्रे तपासणे आणि वितरित करणे, हे दायित्व देण्यात आले आहे. ‘सीएए’ कायद्याच्या अंतर्गत नागरिकत्वासाठी संपूर्ण देशात अनुमाने १२ सहस्र लोकांनी अर्ज केले असून आतापर्यंत ३०० लोकांना नागरिकत्व देण्यात आले आहे.