नोकरी आणि लग्न यांचे आमीष दाखवून फलटण (सातारा) येथे विवाहितेवर धर्मांधाचा बलात्कार !
धर्मांध ‘गझवा-ए-हिंद’ करणार असल्याची पीडितेची माहिती
(‘गझवा-ए-हिंद’ म्हणजे भारतावर आक्रमण करून मुसलमानांनी राज्य करणे)
फलटण (जिल्हा सातारा) – येथील पतीपासून विभक्त रहाणार्या ३० वर्षीय महिलेच्या असाहाय्यतेचा अपलाभ घेऊन तिला लग्न करण्याचे आणि नोकरी लावण्याचे आमीष दाखवून धर्मांधाने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार डिसेंबर २०२२ ते १८ मे २०२४ या कालावधीत घडला आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून हैदर मेटकरी याच्यावर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पीडितेने आरोपीला ‘तू अशा किती मराठी मुलींचा वापर केला आहेस ?’ असे विचारले. तेव्हा धर्मांधाने ‘‘मी गझवा-ए-हिंद महाराष्ट्रात सगळीकडे करणार आहे’’, असे सांगितल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे. (यातून धर्मांध नियोजनपूर्वक हिंदु महिला, मुली यांचे शोषण करत आहेत, हे लक्षात येते. – संपादक)
याविषयी फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला पतीपासून वर्ष २०२१ पासून विभक्त रहाते. त्यांचा न्यायालयामध्ये घटस्फोटाचा खटला चालू आहे. याचाच अपलाभ घेत धर्मांधाने अत्याचार केले. पीडितेने लग्न कधी करणार ? अशी विचारणा केली असता ‘तुला बुरखा घालावा लागेल, टिकली लावायची नाही, नमाज पढायचा’, असे म्हणून मारहाण केल्याचे आणि १५ मार्च २०२४ या दिवशी पीडित महिलेचा व्हिडिओ बनवून तो सामाजिक माध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देऊन मारहाण आणि बलात्कार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. (सहस्रोंच्या संख्येने लव्ह जिहादच्या घटना देशात घडत असतांना हिंदु मुली आणि महिला यांनी धर्मांधांवर विश्वास ठेवणे किती घातक आहे ? हे त्यांच्या लक्षात न येणे, हे दुर्दैव ! – संपादक)
संपादकीय भूमिका :धर्मांध स्वतः लव्ह जिहादचे पुरावे देत असूनही त्या विरोधात कायदा का होत नाही ? |