अहिल्यानगर येथे प्रवरा नदीपात्रात बचाव पथकाची बोट उलटून ३ जणांचा मृत्यू !
अहिल्यानगर – अकोले तालुक्यात प्रवरा नदीपात्रात बचाव कार्य करणारी एस्.डी.आर्.एफ्. पथकाची बोट २३ मे या दिवशी उलटली. त्यामुळे बचाव कार्य करणारे सैनिक पाण्यात पडून ३ जण बुडले, तर अन्य बेपत्ता आहेत. २२ मे या दिवशी प्रवरा नदीपत्रात पोहण्यासाठी गेलेले सागर पोपट जेडगुले आणि अर्जुन रामदास जेडगुले हे दोघे तरुण बुडले. या दुर्घटनेतील सागर जेडगुले याचा मृतदेह २२ मे या दिवशी सापडला होता. अर्जुन जेडगुले याचा शोध घेण्यासाठी २३ मे या दिवशी एस्.डी.आर्.एफ्.चे पथक घटनास्थळी आले होते.