काँग्रेस पक्षाचे आमदार पी.एन्. पाटील यांचे निधन !
कोल्हापूर – काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि करवीर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे आमदार पी.एन्. पाटील (वय ७१ वर्षे) यांचे २३ मे या दिवशी खासगी रुग्णालयात निधन झाले. १९ मे या दिवशी ते घरी स्नानगृहात पाय घसरून पडले होते आणि त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. यानंतर त्यांच्यावर उपचार चालू होते; मात्र उपचारांच्या कालावधीत त्यांची प्राणज्योत मालवली.