वाराणसी आश्रमाचे सूक्ष्म परीक्षण ऐकल्यानंतर आश्रमातील साधकांना जाणवलेली सूत्रे
‘२१.८.२०२३ या दिवशी वाराणसी येथील आश्रमाची छायाचित्रे काढली होती आणि ३०.८.२०२३ या दिवशी सनातनचे सूक्ष्मज्ञान प्राप्तकर्ते श्री. राम होनप यांनी ती छायाचित्रे पाहून आश्रमाचे सूक्ष्म परीक्षण केले. त्यानंतर सत्संगात ही छायाचित्रे दाखवली आणि आश्रमाचे सूक्ष्म परीक्षण वाचून दाखवले. तेव्हा आश्रमातील साधकांना आश्रमाची छायाचित्रे पाहून आणि सूक्ष्म परीक्षण ऐकून जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. श्री. प्रशांत वैती
१ अ. दैवी आश्रमात रहाण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञता वाटणे : ‘सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी सत्संगामध्ये आश्रमाचे महत्त्व सांगितल्यानंतर माझ्या मनात पुष्कळ कृतज्ञताभाव निर्माण झाला. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी साधनेच्या माध्यमातून माझे प्रारब्धभोग संपवण्यासाठी मला उत्तर भारतात पाठवले आहे आणि येथे ‘माझी साधना चांगली व्हावी, यासाठी दैवी आश्रमही दिला आहे’, याची मला जाणीव झाली. ‘गुरुदेव माझ्या प्रगतीसाठी एवढे करतात; परंतु मी त्याचा लाभ करून घेण्यास अल्प पडत आहे’, याचीही मला जाणीव झाली. यापुढे ‘कृतज्ञताभावात राहून साधनेचे प्रयत्न वाढवूया’, असे विचार माझ्या मनात येत होते.
२. सौ. सानिका सिंह
‘वाराणसी आश्रमाचे सूक्ष्म परीक्षण ऐकल्यानंतर ‘ईश्वराने अशा पवित्र आणि दिव्य आश्रमात रहाण्याची मला संधी दिली आहे. मी किती भाग्यवान आहे !’, याची मला कृतज्ञता वाटली.
३. संजय कुमार सिंह
३ अ. वाराणसी आश्रमाची छायाचित्रे पाहून जाणवलेली सूत्रे
१. आरंभी माझ्या हृदयावर दाब जाणवला आणि नंतर हळूहळू मनाची एकाग्रता वाढली.
२. ‘वाराणसी आश्रमाचा रंग हा आकाशाच्या रंगाशी अगदी एकरूप झाला आहे आणि आश्रमाचे चैतन्य दूरपर्यंत पसरले आहे’, असे मला वाटले.
३ आ. सूक्ष्म परीक्षण ऐकल्यानंतर
३ आ १. माझा आश्रमाप्रती कृतज्ञताभाव वाढला.
३ आ २. आश्रमाचे सूक्ष्म परीक्षण ऐकल्यानंतर दैनिक ‘सनातन प्रभात’मधील एका प्रसंगाचे स्मरण होणे आणि ‘हिंदु राष्ट्र सनातनच्या सर्व आश्रमांमध्ये आले आहे’, असे वाटणे : जेव्हा श्री. राम होनप (सूक्ष्मज्ञान प्राप्तकर्ता साधक) यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना विचारले, ‘आपण सांगितले होते की, हिंदु राष्ट्र प्रथम रामनाथी आश्रमात आणि त्यानंतर सर्वत्र येईल.’ तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, ‘हा व्यष्टी स्तरावरचा विचार आहे. समष्टी स्तरावर विचार व्हायला पाहिजे, म्हणजे रामनाथी आश्रमासमान सनातनच्या सर्व आश्रमांमध्ये असे व्हायला पाहिजे.’ सूक्ष्म परीक्षण ऐकल्यानंतर असे जाणवले की, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे कथन आज सिद्ध झाले आहे. सनातनच्या सर्व आश्रमांमध्ये हिंदु राष्ट्र आले आहे.’
४. सौ. प्राची जुवेकर
४ अ. आश्रम सोडून अन्य कुठेही मन लागत नाही ! : ‘सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी आश्रमाच्या परीक्षणाविषयी सांगितले. ते ऐकून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. जेव्हा आम्ही सेवेसाठी कधी बाहेर रहातो किंवा घरी जातो, तेव्हा ‘आश्रमात केव्हा परत जाऊ ?’, अशी मनाला तळमळ लागते. आश्रम सोडून अन्य कोठेही मन लागत नाही. ‘ही आश्रमाप्रतीची तळमळ केवळ आश्रमाच्या चैतन्यामुळे आहे’, हे माझ्या लक्षात आले.
४ आ. आश्रमात आल्यानंतर ‘आपण आपल्या घरी परत आलो’, असे मला वाटते. ‘आम्ही प्रत्यक्ष गुरुदेवांच्या छत्रछायेतच आहोत’, असे जाणवून मन शांत रहाते.’
५. सौ. मीरा केशरी
५ अ. कृतज्ञताभाव अधिक वाढणे आणि ‘साधनेचे प्रयत्न वाढवायला पाहिजेत’, असा विचार येणे : ‘आश्रमाचे पहिले छायाचित्र पाहून मला शांत वाटले आणि ते मंदिरासारखे वाटले. ते छायाचित्र सकाळचे होते आणि दुसरे छायाचित्र सायंकाळचे होते. ते पाहून मला पुष्कळ चैतन्य मिळू लागले. माझा आध्यात्मिक त्रासही चालू झाला होता. यावरून हे लक्षात आले की, त्या छायाचित्रात निर्गुण तत्त्व आणि मारक तत्त्व अधिक आहे. माझा कृतज्ञताभाव अधिक वाढला आणि ‘साधनेचे प्रयत्न वाढवायला पाहिजेत’, असा विचार आला.’
६. श्री. रूपेश गोकर्ण
६ अ. फेब्रुवारी २०२३ मध्ये मी वाराणसी आश्रमात येण्यास निघालो. तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी मला सांगितले, ‘‘ईश्वर तुझी आध्यात्मिक प्रगती व्हावी, यासाठी तुला वाराणसीला पाठवत आहे.’’ तेव्हा ‘वाराणसी आध्यात्मिक दृष्टीने मोक्ष नगरी आहे. ईश्वराने मला मोक्ष नगरीत साधना करण्यासाठी पाठवले आहे’, असा विचार येऊन मला कृतज्ञता वाटली. वाराणसी आश्रमात आल्यानंतर रामनाथी आश्रमात जाण्याचा विचारच आला नाही. मला ‘हाच रामनाथी आश्रम आहे, असे वाटते. (क्रमशः)
(वरील सर्व सूत्रांसाठी दिनांक १५.११.२०२३)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लीक करा : https://sanatanprabhat.org/marathi/798065.html
|