All Pakistanis are Hindus : आम्ही सर्व हिंदूंची मुले आहोत ! – पाकिस्तानी नागरिक
इस्लामाबाद – पाकिस्तानातील मुसलमानही आता स्वतःला ‘हिंदूंची मुले’ म्हणू लागले आहेत. ‘कनारिया रिसर्च’ नावाच्या यूट्यूब वाहिनीने पाकिस्तानातील मुसलमानांच्या विधानांचा एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. यामध्ये पाकिस्तानातील मुसलमान त्यांच्या पूर्वजांना ‘हिंदु’ म्हणत असल्याचे दिसत आहे. याच व्हिहिओत पाकिस्तानी वंशाचे दिवंगत तारेक फतेह यांचेही वक्तव्य आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील मुसलमान इस्लामला मानत नाहीत. ते वेगळ्याच प्रकारचे लोक आहेत, ज्यांचा ना भारतीय संस्कृतीवर विश्वास आहे, ना पर्शियन संस्कृतीवर. अर्थात् भारत आणि पाकिस्तान येथील मुसलमानांचे पूर्वज मात्र हिंदूच होते.’
मंगोलियाशी भारतीय मुसलमानांचे संबंध !
एका पाकिस्तानी पत्रकाराशी केलेल्या संभाषणात भारतीय वक्ते हर्षवर्धन जैन यांनी पाकिस्तान आणि भारत येथील मुसलमानांविषयी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, ज्या धर्मातील लोक सुरक्षिततेसाठी ‘सलाम’ करतात, तेच लोक इतरांच्या कमरेवर वार करतात. अनुमाने १ सहस्र २०० मंगोलियन भारतात आले होते. बाबर हादेखील मंगोलांचा वंशज होता. यानंतर भारतातील हिंदूंनी भीतीपोटी किंवा लोभापोटी इस्लाममध्ये धर्मांतर केले.