Hemant Biswas Sharma : चीनने भारताची कोणतीही भूमी बळकावलेली नाही ! – आसामचे मुख्यमंत्री सरमा
काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी योगी आदित्यनाथ यांची रावणाशी केलेल्या तुलनेचे प्रकरण
नवी देहली – चीनने भारताची कोणतीही भूमी बळकावलेली नाही, तसेच कोणत्याही भागावर अतिक्रमण केलेले नाही. जर नाना पटोले यांना असे वाटत असेल, तर मी त्यांना चीनच्या सीमेवर घेऊन जायला सिद्ध आहे, असे वक्तव्य आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी नाना पटोले यांच्या विधानावर केले.
२१ मे या दिवशी काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते नाना पटोले यांनी म्हटले होते की,
सीतामातेला पळवून नेण्यासाठी रावण भगवे कपडे घालून आला होता. आता योगी आदित्यनाथ भगवे कपडे घालून येतात. (पटोले अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानाविषयी असे बोलण्याचे धाडस दाखवतील का ? – संपादक) ते चीनच्या सीमेवरील अतिक्रमणावर, महागाई आणि बेरोजगारी या सूत्रांवर काहीच बोलत नाहीत.
काँग्रेसला सनातन धर्माचा द्वेष आहे ! – भाजप
पटोले यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना भाजपचे प्रवक्ते मनीष शुक्ला म्हणाले की, काँग्रेससह इंडी आघाडीला भगव्या रंगाचा द्वेष आहे. त्यांना सनातन धर्माचा द्वेष आहे. काँग्रेसनेच ‘भगवा आंतकवाद’ हा शब्द निर्माण केला.