नम्र, इतरांना साहाय्य करणार्या आणि स्वतःमध्ये पालट करणार्या मथुरा सेवाकेंद्रातील सुश्री (कु.) प्रियंका सिंह !
‘वैशाख शुक्ल चतुर्दशी (२२.५.२०२४) या दिवशी मथुरा सेवाकेंद्रातील साधिका सुश्री (कु.) प्रियंका सिंह यांचा ४७ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त मथुरा सेवाकेंद्रातील साधकांना सुश्री प्रियंका सिंह यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
सुश्री (कु.) प्रियंका सिंह यांना ४७ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. सुश्री (कु.) पूनम चौधरी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१ अ. चिकाटी
१. ‘सुश्री प्रियंकाताई शारीरिक त्रासांवर मात करून साधना करते.
२. साधकाने एखादी चूक लक्षात आणून दिल्यावर तिचा संघर्ष झाला, तरीही ती पुन्हा प्रयत्न करून सेवा करते.
१ आ. इतरांना साहाय्य करणे : एखादी तातडीची सेवा आल्यास ती स्वतःची सेवा बाजूला ठेवून इतरांना साहाय्य करण्यास नेहमीच तत्पर असते.
१ इ. इतरांचा विचार करणे : एखाद्या साधकाला काही त्रास होत असेल आणि त्याला एखादा पदार्थ हवा असेल, तर ती लगेच त्याला तो पदार्थ करून देते.
१ ई. सेवाभाव : तिने घरातील कामे फारशी केली नाहीत; परंतु आश्रमात आल्यानंतर ती प्रसाद आणि महाप्रसाद बनवणे, स्वच्छता करणे यांसारख्या सेवा मन लावून करते.
१ उ. तिच्याकडून ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावरील दृढ श्रद्धा’ आणि ‘साधनेची तळमळ’, हे गुण मला शिकता आले.
१ ऊ. जाणवलेला पालट
१. प्रेमभाव वाढणे : पूर्वीपेक्षा तिच्यामधील प्रेमभाव वाढला आहे. तिने माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला संदेश पाठवून माझ्या प्रकृतीची विचारपूस केली.’
२. श्री. प्रणव मणेरीकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ४४ वर्षे), मथुरा सेवाकेंद्र, उत्तरप्रदेश
१ अ. नम्रता : ‘सुश्री प्रियंकाताई सर्वांशी नम्रतेने बोलते.
१ आ. स्वीकारण्याची वृत्ती : तिला कुणीही सेवा सांगितली, तरी ती मन लावून सेवा करण्याचा प्रयत्न करते.
३. इतरांना साहाय्य करणे : एखाद्या साधकाने ताईकडे साहाय्य मागितल्यास, ती लगेच साहाय्य करते. ती साहाय्य करण्याचा कधी कंटाळा करत नाही.
४. जाणवलेले पालट
४ अ. स्वीकारण्याची वृत्ती वाढणे : एखाद्या साधकाने तिला तिची चूक सांगितल्यावर आधी चूक स्वीकारण्यासाठी तिचा संघर्ष होऊन तिला राग येत असे; पण आता ते प्रमाण न्यून झाले आहे.
४ आ. अपेक्षा न्यून होणे : आता तिची ‘मान-सन्मान मिळावा’, अशी अपेक्षा न्यून झाली आहे.’
‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने आम्हाला अनेक गुणांनी युक्त असलेल्या प्रियंकाताईच्या समवेत राहून सेवा करण्याची आणि शिकण्याची संधी मिळाली’, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
(सर्व सूत्रांचा दिनांक २.५.२०२४)