कोल्हापूर येथील कारवाईत ९ खिल्लार बैलांची गोतस्करांपासून सुटका !

प्रतिकात्मक छायाचित्र

कोल्हापूर – कोल्हापूर मार्गे आजरा कर्नाटक येथून २० मे या दिवशी गोवंशियांच्या कत्तलीसाठी वाहतूक होणार असल्याची माहिती गोरक्षक अक्षय कांचन यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांना घेऊन त्या ठिकाणी थांबले असता एक आयशर गाडी कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगाने येतांना दिसली. पोलिसांनी गाडी थांबवून गाडीचालक मुतप्पा पाटील, तसेच त्याच्यासह असणार्‍या यल्लाप्पा पट्टनकुडे याच्याकडे चौकशी केली असता त्यामध्ये ९ खिल्लार बैल आढळून आले.  पोलिसांच्या साहाय्याने बैलांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी अक्षय कांचन यांनी तक्रार दिली आहे.

संपादकीय भूमिका

गोवंश हत्याबंदी कायद्याच्या प्रभावी कार्यवाहीची आवश्यकता सांगणारी घटना !