iran president ebrahim raisi : इराणचे राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्या मृत्यूमुळे भारतात १ दिवसाचा राजकीय दुखवटा !
नवी देहली – इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्री यांच्या हेलीकॉप्टरच्या अपघातात मृत्यू झाला. यानिमित्त भारत सरकारने २१ मे या दिवशी देशात एक दिवसाचा राजकीय दुखवटा पाळला. केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितले की, संपूर्ण भारतामध्ये एक दिवसाचा राजकीय शोक पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दिवशी भारतातील सर्व इमारतींवरील राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवण्यात आले, तसेच कोणतेही अधिकृत कार्यक्रम आयोजित केले गेले नाहीत.
India observes one-day mourning for Iranian President Ebrahim Raisi’s death
The National flag was flown as half-mast at the Rashtrapati Bhavan pic.twitter.com/ZFpZ9AQCxL
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 21, 2024
१. इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा १९ मे या दिवशी मृत्यू झाला. अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इल्हाम अलीयेव यांच्यासमवेत ते एका धरणाचे उद्घाटन करणार होते; पण तेथे जातांना त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला.
२. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनाविषयी शोक व्यक्त केला.
३. रायसी यांच्याशी भारताचे चांगले संबंध होते. त्यांच्या कार्यकाळात भारत आणि इराण या दोन्ही देशांमध्ये अनेक करार झाले. काही दिवसांपूर्वीच चाबहार बंदरासंदर्भात भारत आणि इराण या उभय देशांमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण करार झाला होता.