Kerala HC Upholds Death Sentence : केरळमध्ये विधी शाखेच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करून हत्या केल्याच्या प्रकरणी महंमद इस्लाम याला फाशीची शिक्षा

थिरूवनंतपूरम् (केरळ) – विधी शाखेच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणी केरळ उच्च न्यायालयाने महंमद अमीर-उल्-इस्लाम याला फाशीची शिक्षा सुनावली.

२ एप्रिल २०१६ या दिवशी ‘एर्नाकुलम् गव्हर्नमेंट लॉ कॉलेज’च्या विद्यार्थिनीचा  मृतदेह राज्यातील पेरुंबवूरमधील तिच्या घरात सापडला. या घटनेनंतर त्या वेळी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले होते. ही विद्यार्थिनी दलित असल्याने संताप व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणी आसाममधील परप्रांतीय कामगार असलेला अमीर-उल् इस्लाम याला अटक करण्यात आली होती. त्याने मद्याच्या नशेत विद्यार्थिनीच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या केली होती.

इस्लाम याला वर्ष २०१७ मध्ये एर्नाकुलम् सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात त्याने केरळ उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय कामम ठेवला.

संपादकीय भूमिका

  • राष्ट्रपतींनी दयेच्या नावाखाली अशांच्या शिक्षेत घट करू नये आणि त्याच्या शिक्षेची कार्यवाही तात्काळ करावी, असेच जनतेला वाटते !
  • बलात्कार आणि हत्या करणार्‍यांना अशीच कठोर शिक्षा मिळू लागल्यासच अशा घटना रोखण्यास साहाय्य होईल !