पुणे येथील गुन्हेगार तबरेझ सुतार याची कारागृहातून खंडणी आणि हत्येची धमकी !
|
पुणे – गुन्हेगार बापू नायर टोळीतील सराईत गुन्हेगार तबरेझ सुतार याने कारागृहामध्ये राहून व्यावसायिकांना धमकी देत १० लाख रुपयांची खंडणी वसूल केली. धमकी देण्यासाठी त्याने १४ भ्रमणभाष क्रमांकांचा उपयोग केला होता. तरबेझ याने व्यावसायिकाकडे ३० लाख रुपयांची खंडणी मागितली. संबंधित व्यावसायिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केल्यानंतर हा प्रकार उघड झाला.
या प्रकरणी तबरेझ सुतार, अविनाश मोरे, सागर धुमाळ आणि कुमार उपाख्य पप्पू सायकर यांच्या विरोधात खंडणीसह विविध कलमांद्वारे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यापैकी सागर धुमाळ आणि अविनाश मोरे यांना पोलिसांनी अटक केली आहे.
संपादकीय भूमिका
कारागृहातही गुंडांचेच राज्य चालते का ? असा प्रश्न कुणाला पडल्यास चूक ते काय ? कारागृहामध्ये गुन्हेगारांना एवढे भ्रमणभाष कसे काय वापरायला मिळतात ? या स्थितीला कारणीभूत असणार्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी ! |