सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाचे संगणकीय प्रक्षेपण पहातांना फरिदाबाद येथील सौ. सीमा शर्मा यांना आलेल्या अनुभूती
१. ब्रह्मोत्सवाच्या आधी घरात मोगर्याच्या फुलांचा सुगंध येणे : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या आदल्या रात्री (१०.५.२०२३ या दिवशी) मला झोपेतून मधेच जाग आली. तेव्हा मला मोगर्याच्या फुलांचा सुगंध येत होता. मी सकाळी उठल्यावर मला पूर्ण घरात मोगर्याच्या फुलांचा सुगंध येत होता. त्या वेळी आमच्या घरात कुठेही मोगर्याचे फूल नव्हते. मला पुष्कळ उत्साह वाटत होता.
२. ११.५.२०२३ या दिवशी सोहळा आरंभ होण्यापूर्वी मी गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) प्रार्थना करत होते. तेव्हा ‘पडद्यावर लिहिलेल्या ‘ब्रह्मोत्सव’ या शब्दामध्ये यज्ञकुंडात अग्नि प्रज्वलित झाला आहे’, असे मी अनुभवले. मला तेथे तेजतत्त्व अनुभवता आले.
३. आम्ही सोहळा पहात असलेल्या ठिकाणी प.पू. गुरुदेवांच्या छायाचित्रासमोर दिवा ठेवला होता. तो प्रज्वलित होण्याआधीच ‘दिव्याच्या चारही बाजूंनी चक्र फिरत आहे’, असे मला अनुभवता आले.
४. प.पू. गुरुदेव, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ विराजमान असलेला रथ व्यासपिठाच्या दिशेने जात होता. तेव्हा एका क्षणासाठी ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ प.पू. गुरुदेवांमध्ये विलीन झाल्या आहेत’, असे मला जाणवले.
५. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी प.पू. गुरुदेवांच्या श्रीचरणी पुष्प अर्पण केल्यानंतर गुरुदेवांना नमस्कार केला. तेव्हा मी डोळे मिटल्यानंतर मला प.पू. गुरुदेव, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ ज्योतीस्वरूपात दिसले.
६. साधक सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचा परिचय करून देत असतांना मला त्यांच्या ठिकाणी प.पू. गुरुदेवांचे दर्शन झाले.
७. रथ मार्गक्रमण करत असतांना मला संपूर्ण रथ सुवर्णाचा असल्यासारखे जाणवत होते आणि रथ पुष्कळ चैतन्यदायी होता.
मला हे सर्व अनुभवायला दिल्याबद्दल मी तिन्ही मोक्षगुरूंच्या (प.पू. गुरुदेव, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या) श्रीचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. सीमा शर्मा, फरिदाबाद (२७.५.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |