एका आध्यात्मिक संस्थेच्या पदाधिकार्‍यांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील दैवी शक्ती जाणवणे

  ‘ग्लोबल स्पिरिच्युअल महोत्सव’ या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (उजवीकडे) आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (डावीकडे)

एक साधक : ‘ग्लोबल स्पिरिच्युअल महोत्सव’ या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल मी सनातन संस्थेच्या वतीने मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. आमच्या प्रतिनिधींसाठी या महोत्सवातील सहभाग हा एक ज्ञानवृद्धी करणारा अनुभव ठरला असून समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी संस्था करत असलेल्या प्रयत्नांना अधिक बळ मिळाले.

ज्ञानवृद्धी करणारा हा आध्यात्मिक सोहळा आयोजित करण्यासाठीचे आपले समर्पित प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद आहेत. या संपूर्ण सोहळ्यात आपले अगत्य आणि काटेकोर नियोजन यांसाठी आम्ही कृतज्ञ आहोत. आम्हा सर्वांच्या आध्यात्मिक उन्नतीच्या प्रवासावर या महोत्सवाने संस्मरणीय अशी छाप उमटवली आहे. व्यक्तीमध्ये परिवर्तन घडवून आणणारा हा आध्यात्मिक मेळावा आयोजित करण्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !

सौ. अंजली बापट : आपल्या उपस्थितीने आमच्या महोत्सवाची शोभा वाढवली.

एक साधक : आपण रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट द्यावी, अशी मी विनंती करतो.

सौ. अंजली बापट : मी निश्चितपणे सनातन आश्रमाला भेट देईन. आपल्या गुरुमाता (श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ) दैवी असून साक्षात् देवींप्रमाणेच आहेत. त्यांना आश्रमात येऊन भेटण्यास मी पुष्कळ उत्सुक आहे.

– एक साधक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.३.२०२४)