आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हे नोंद !
मुंबई – आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी विविध ठिकाणी गुन्हे नोंदवले आहेत. त्यात दारूच्या बाटल्यांसह एका महिलेला कुरार पोलिसांनी कह्यात घेतले. याशिवाय साबुसिद्धीकी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर धर्माच्या आधारे मतदान करण्याचे आवाहन केल्याप्रकरणीही पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. प्रचाराचा अवधी संपल्यानंतरही सामाजिक माध्यमांद्वारे प्रचार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.