Patanjali : पतंजलि आस्थापनाच्या सोनपापडीची गुणवत्ता निकृष्ट ठरल्याच्या प्रकरणी ३ जणांना ६ मासांचा कारावास

पिथरोगड (उत्तराखंड) – योगऋषी रामदेवबाबा यांच्या पतंजलि आस्थापनाच्या सोनपापडी या पदार्थाची गुणवत्ता चाचणीत निकृष्ट ठरल्यामुळे उत्तराखंडमधील पिथोरागडच्या न्यायदंडाधिकार्‍यांनी ‘पतंजलि आयुर्वेद लिमिटेड’ या आस्थापनाच्या साहाय्यक व्यवस्थापकासह ३ जणांना ६ महिन्यांचा कारावास आणि दंड, अशी शिक्षा सुनावली.

अन्न सुरक्षा निरीक्षकांनी वर्ष २०१९ मध्ये बेरीनाग, रुद्रपूर, उधमसिंहनगर आणि उत्तराखंडमधील काही दुकानांमधील पतंजलिच्या सोनपापडीचे नमुने गोळा केले होते. अन्न आणि औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळांमध्ये या सोनपापडीची तपासणी करण्यात आली. या प्रयोगशाळांनी डिसेंबर २०२० मध्ये राज्याच्या अन्न सुरक्षा विभागाला पतंजलिच्या सोनपापडीची निकृष्ट गुणवत्ता दर्शवणारा अहवाल पाठवला. त्यानंतर व्यावसायिक लीलाधर पाठक, विरतक अजय जोशी आणि पतंजलिचे साहाय्यक व्यवस्थापक अभिषेक कुमार यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले.