New Guidelines on Miracles in Vatican City : आता पोप यांनी मान्यता दिलेली दैवी घटनाच चमत्कारिक मानली जाणार !
व्हॅटिकन सिटीकडून ख्रिस्त्यांमधील चमत्कारांवर नवी मार्गदर्शिका प्रसारित
व्हॅटिकन सिटी – व्हॅटिकन सिटीमध्ये दैवी चमत्कारांच्या संदर्भात एक मार्गदर्शिका प्रसारित करण्यात आली आहे. याद्वारे फसवणूक आणि खोट्या गोष्टी यांना आळा घालण्यात येणार आहे. आता पोप यांनी मान्यता दिलेली दैवी घटनाच चमत्कारिक मानली जाणार आहे.
१. या मार्गदर्शिकेनुसार चर्चचे पाद्री प्रथम सर्व दाव्यांची चौकशी करतील. या काळात ते दावे नाकारू शकतात. ते कोणत्याही चमत्कारिक वस्तू किंवा स्थानाची पूजा करण्यास मनाईदेखील करू शकतात.
२. पैसे कमावण्यासाठी दैवी प्रकटीकरणाचे दावे केले जात आहेत का ? याचीही पाद्री चौकशी करतील. यानंतर तपासाचे पुरावे आणि तपशील पोपकडे पाठवले जातील. त्यानंतर हा चमत्कार होता कि नाही ? हे पोप ठरवतील.
३. कृत्रिम बुद्धीमत्ता (ए.आय.) आणि सामाजिक माध्यमाचा वापर दैवी चमत्काराविषयीची खोटी माहिती पसवरण्यासाठी केली जाऊ शकते, अशी भीती व्हॅटिकन सिटीला वाटत आहे.