गोदान एक्सप्रेसच्या डब्याखालून अचानक धूर निघाल्याने प्रवाशांचा गोंधळ !
नाशिक – इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावाजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्याखालून अचानक धूर निघाला. त्यामुळे बोगीत गोंधळ उडाला. पडताळणी केली असता तांत्रिक अडचण असल्याचे लक्षात आले. गाडी सुरक्षितरित्या इगतपुरी स्थानकावर नेण्यात आली.
प्रथम गाडीतून खाली उतरण्यासाठी प्रवाशांनी पुष्कळ घाई केली. जिवाच्या आकांताने सर्वजण खाली उतरण्यासाठी धडपडत होते. काही प्रवाशांनी तर गाडीतून खाली उड्या घेत स्वत:ची सुटका करण्याचा प्रयत्न केला.