पनवेल येथे ‘श्रीकृष्ण चिकित्सालया’चा तृतीय वर्धापनदिन साजरा !
पनवेल – अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चालू करण्यात आलेल्या डॉ. अशोक तांबेकर यांच्या ‘श्रीकृष्ण चिकित्सालया’चा तृतीय वर्धापनदिन साजरा करण्यात आला. या वेळी सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन लावून विनामूल्य रोगनिदान आणि उपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन सनातनचे संत पू. भाऊ परब यांच्या शुभहस्ते नारळ वाढवून करण्यात आले. शिबिराच्या वेळी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या ‘अक्षय्य तृतीया’ विशेषांकाचे विनामूल्य वितरण करण्यात आले.
या शिबिरात सिमिरी डायग्नोस्टिक पनवेल, तसेच मेडिकव्हर हॉस्पिटल, खारघर आणि ‘गुड लाईफ’चे प्रमुख श्री. सोळंकी यांनी सहभाग घेतला. या शिबिराचा लाभ सनातनचे साधक आणि समाजातील १०० हून अधिक रुग्णांनी घेतला.