साधकांनो, पावसाळ्याच्या पूर्वसिद्धतेच्या दृष्टीने आश्रमातील सेवांमध्ये सहभागी व्हा !

गोवा येथील सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

‘आगामी पावसाळ्याच्या दृष्टीने रामनाथी (गोवा) आणि देवद (पनवेल) येथील आश्रमांत पूर्वसिद्धता करण्यात येत आहे. ‘पावसाचे पाणी आत येऊ नये’, यासाठी फ्लेक्स किंवा प्लास्टिक लावणे; कपडे वाळवण्यासाठी, तसेच साहित्य आणि वाहन ठेवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाच्या निवारा शेड बनवणे; फुटलेली कौले काढून तेथे नवीन कौले बसवणे; गंज येऊ शकणार्‍या लोखंडी वस्तूंना रंग देणे; पावसाळ्यापूर्वी स्वच्छता करणे इत्यादी सेवांसाठी शारीरिक क्षमता असलेल्या साधकांची आवश्यकता आहे. इच्छुक साधकांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून पुढील सारणीनुसार स्वतःची माहिती पाठवावी.

नाव आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०

संगणकीय पत्ता : sanatan.sanstha2025@gmail.com

टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१’

(१७.५.२०२४)