पंढरपूर येथील विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन २ जूनपासून चालू होणार !
पंढरपूर – गेल्या अडीच महिन्यांपासून येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये संवर्धन आणि सुशोभिकरण यांचे काम चालू असल्यामुळे बंद असलेले विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन २ जूनपासून पुन्हा चालू होणार आहे, अशी माहिती विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने दिली आहे. मंदिर समितीच्या बैठकीत याविषयीचा निर्णय घेण्यात आला आहे.