हिंदु जनजागृती समितीच्या स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गातील प्रशिक्षकांनी स्वतःच्या जीवनात झालेले पालट सांगितल्यामुळे प्रेरणा मिळून कृतीप्रवण झालेले शिबिरार्थी !
‘हिंदु जनजागृती समितीच्या वतीने युवकांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग आणि या वर्गांच्या प्रशिक्षकांसाठी ठिकठिकाणी शिबिरे आयोजित केली जातात. या शिबिरांतून कृतीप्रवण झालेल्या शिबिरार्थींचे अनुभव १२ मे या दिवशी पाहिले. आज उर्वरित अनुभव पाहूया.
या आधीचा भाग पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/792944.html
५. प्रशिक्षकांचे अनुभवकथन ऐकल्यावर गोवा येथील धर्मप्रेमी शिबिरार्थींनी व्यक्त केलेले मनोगत !
५ अ. कु. विकिता साळगावकर, गोवा : ‘मी बांदा, जिल्हा सिंधुदुर्ग येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिक करतांना कु. पूजा धुरीला पाहिले. तेव्हा मला छान वाटले. तेव्हा मी प्रशिक्षण शिकायचे ठरवले. नंतर मी ‘ऑनलाईन’ प्रशिक्षणवर्गाला जोडले गेले. मला पूजाताईकडून प्रेरणा मिळाल्यावर मी प्रशिक्षणवर्गात सहभागी झाले. आता मला कुडाळ सेवाकेंद्रात शिबिराला येण्याची संधी मिळाली, याचा मला आनंद होत आहे.’
५ आ. कु. सुरभी छत्रे, गोवा
१. ‘शिबिरात कु. अदिती तवटेताईने सांगितले, ‘‘दुसर्या दिवशी कठीण विषयाची परीक्षा असतांनाही मी सेवेला गेले होते, तरीही मला त्या विषयात गुरुकृपेने चांगले गुण मिळाले.’’ शिबिर संपल्यानंतर २ दिवसांनी माझीही परीक्षा चालू होणार होती. ताईचे मनोगत ऐकल्यावर माझ्या मनातील परीक्षेचा ताण निघून गेला.
२. एका ताईने मनोगत व्यक्त करतांना ती एका विषयात अनुत्तीर्ण झाल्याचे सांगितले; पण त्यावर तिने निराश न होता ‘गुरुदेवांना आपल्याला या परिस्थितीतूनही शिकवायचे आहे’, असा भाव ठेवला. ‘साधनेमुळेच आपण सकारात्मक राहू शकतो’, हे त्या ताईकडून मला शिकता आले.’
६. रत्नागिरी जिल्ह्यातील शिबिरार्थींनी व्यक्त केलेले मनोगत
६ अ. लांजा
६ अ १. कु. ऐश्वर्या कनावजे : ‘सर्वांचे ऐकून आपणही तसे प्रयत्न करू शकतो’, अशी मला प्रेरणा मिळाली. यापुढे मी साधनेसाठी अधिकाधिक प्रयत्न करीन.’
६ अ २. कु. शिवानी साळवी : मला ‘साधना कशी करायची ?’, ‘गुरु आपले रक्षण कसे करतात ?’, हे लक्षात आले. सर्वकाही गुरूंच्या हातात असल्यामुळे मी आता साधनाच करणार आहे.’
६ आ. चिपळूण
६ आ १. श्री. विशाल राजभर : ‘हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सहभागी झाल्यापासून स्वतःसह कुटुंबियांमध्ये अनेक चांगले पालट झाले आहेत. मी मित्र आणि नातेवाईक यांना समितीचे कार्य सांगून त्यांना समितीच्या कार्याशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे.’
६ आ २. श्री. युवराज आंग्रे : ‘पूर्वी मी साधनेचे प्रयत्न करत नव्हतो. माझा केवळ व्यावहारिक जीवनाकडे कल होता. आता मला लक्षात आले की, केवळ ‘कृष्ण’ हेच सत्य आहे. आता मी त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणार आहे.’
६ इ. दापोली
६ इ १. श्री. विश्वनाथ बेर्डे : शिबिरामध्ये मला ‘हिंदु धर्मरक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे ?’ हे शिकायला मिळाले. माझ्या परीने हिंदु धर्माचे रक्षण करण्याचा मी प्रयत्न करीन.’
६ इ २. कु. सिद्धि वेल्हाळ : ‘आम्ही नामजप करायला लागल्यापासून मनाला धीर आला आणि आनंद मिळत आहे.’
६ इ ३. कु. अवंतिका पावसे : ‘मी शिक्षणातून वेळ काढून भगवंताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करीन.’
७. सोलापूर
७ अ. श्री. यश मुगड्याल : ‘प्रशिक्षकांचे साधना करण्यापूर्वी आणि साधनेत आल्यानंतरचे अनुभव ऐकून माझा साधना करण्याचा उत्साह वाढला. आता मला ‘आपणही त्यांच्यासारखे प्रयत्न करून साधनेत प्रगती करूया आणि आजपासून देश अन् धर्म यांच्यासाठी काहीतरी त्याग करायला हवा’, असे वाटले.
८. कर्नाटक
८ अ. कु. पद्मावती उप्पार, दांडेली, कर्नाटक : ‘पूर्वी मी सनातनच्या आश्रमामध्ये राहिले होते; पण माझ्यात साधनेचे गांभीर्य अल्प होते. प्रशिक्षकांचे मनोगत ऐकून साधनेचे महत्त्व लक्षात आले. ’
८ आ. कु. स्फूर्ती, गदग, कर्नाटक : ‘प्रशिक्षकांचे मनोगत ऐकून ‘त्यांच्यासारखी साधना करावी’, असे मला वाटले. मीही सेवा करीन.’
९. पुणे
९ अ. श्री. रवींद्र शेळके : ‘आपल्या मनामध्ये गुरूंप्रती भाव आणि श्रद्धा असेल, तरच आपल्याला त्याग करण्याची बुद्धी होते. ‘श्रद्धा ठेवावी’, असे गुरु माझ्याही आयुष्यात आहेत, याचा मला अभिमान वाटतो.’
९ आ. श्री. सुजय ढगे : ‘सर्व सुखासीन आयुष्य बाजूला ठेवून केवळ धर्मकार्यासाठी पूर्णपणे वाहून घेण्याचा घेतलेला निर्णय मला भावला.’
९ इ. कु. दिव्या गव्हाणे : ‘सर्वांचे अनुभव ऐकल्यानंतर मला प्रयत्नांसाठी दिशा मिळाली’, असे मला वाटते. मला राष्ट्र आणि धर्म यांसाठी अधिकाधिक वेळ द्यायचा आहे. माझी साधना वाढवायची आहे. सेवेतून जो आनंद मिळतो, तो मला घ्यायचा आहे.’
९ ई. कु. सिद्धि डावल : ‘आयुष्याचे ध्येय म्हणजे नोकरी करणे, गाडी आणि बंगला मिळवणे, हे नसून ‘धर्मरक्षणासाठी प्रयत्न करणे आणि त्यासाठी साधना वाढवणे’, हे खरे ध्येय असल्याचे माझ्या लक्षात आले आहे.’
९ उ. कु. रूपाली शिंदे : ‘आम्ही जीवनाचे अंतिम ध्येय ‘करिअर’ करणे आहे, हा संकुचित विचार करत होतो. या अनुभवकथनाच्या सत्रामुळे तो विचार पूर्णपणे पालटला आहे. ‘राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी आमचेही काहीतरी कर्तव्य आहे’, याची मला जाणीव झाली. ’
९ ऊ. कु. स्वप्नाली टक्के : ‘शिबिरात सहभागी झाल्यानंतर ‘मी नवीन गावात प्रशिक्षणवर्गाचा प्रसार करीन आणि नवीन वर्ग चालू करण्यासाठी प्रयत्न करीन’, असा आत्मविश्वास वाटू लागला आहे.’
९ ए. कु. गौरी धामणकर : ‘आतापर्यंत आम्ही साधना आणि अध्यात्म याला महत्त्व दिले नव्हते. त्याचे महत्त्व या शिबिरातून आम्हाला शिकायला मिळाले. प्रशिक्षकांचे अनुभव ऐकून ‘साधनेचे बळ किती महत्त्वाचे आहे !’, हे माझ्या लक्षात आले. ‘शारीरिक आजारांवरही कशी मात करू शकतो ? आपल्याला गुरु कसे साहाय्य करतात ?’, हे मला शिकायला मिळाले.’
एकंदरीत शिबिरात झालेल्या या विषयाच्या माध्यमातून ‘श्री गुरूंना अपेक्षित अशी जागृती युवकांमध्ये आणि युवकांच्या मनात गुरुदेवांप्रती भाव निर्माण करण्यात श्री गुरूंच्याच कृपेने शक्य झाले’, असे मला अनुभवता आले. हे सर्व अनुभवण्याची संधी दिल्याबद्दल मी श्री गुरूंच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’ (समाप्त)
– श्री. हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती. (२६.८.२०२३)