Tuljabhavanidevi Temple Donation Scam : श्री तुळजापूर येथील पुजारी मंडळाच्या वतीने हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक-सदस्य अधिवक्ता (पू.) सुरेश कुलकर्णी यांचा सन्मान !
श्री तुळजाभवानी मंदिरातील दानपेटी घोटाळ्याच्या विरोधात (पू.) सुरेश कुलकर्णी गेल्या ९ वर्षांपासून सातत्याने देत आहेत लढा !
तुळजापूर (जिल्हा धाराशिव), १७ मे (वार्ता.) – श्री तुळजाभवानी मंदिरातील दानपेटी घोटाळ्याच्या विरोधात गेल्या ९ वर्षांपासून सातत्याने लढा देणारे हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक-सदस्य अधिवक्ता (पू.) सुरेश कुलकर्णी यांचा पुजारी मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला. अधिवक्ता (पू.) कुलकर्णी यांच्यामुळे सर्व आरोपींवर गुन्हे नोंदवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने नुकताच दिला. या वेळी पुजारी मंडळाचे उपाध्यक्ष श्री. विपीन शिंदे यांनी श्रीक्षेत्र तुळजापूर येथे अधिवक्ता (पू.) सुरेश कुलकर्णी यांचा शाल, कवड्यांची माळ आणि श्री तुळजाभवानी देवीचे चित्र भेट देऊन सन्मान केला.
या वेळी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. किशोर गंगणे, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे, तसेच श्री तुळजाभवानी मंदिराचे पुजारी, भक्तगण आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
The Pujari Mandal (A body of the temple’s archakas) of Sri Tuljapur Temple, honor the founder-member of the Hindu Vidhidnya Parishad, Advocate H.H. Suresh Kulkarni
🚩 H.H. Suresh Kulkarni has been fighting continuously for the past 9 years, exposing the donation box scam in Sri… pic.twitter.com/S1CodZX6R2
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 18, 2024
पुजारी मंडळाच्या वतीने श्री तुळजाभवानीदेवीची महाआरती !
यानंतर न्यायालयीन लढा देण्यासाठी आई तुळजाभवानी मातेनेच बळ दिल्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अधिवक्ता (पू.) सुरेश कुलकर्णी आणि इतर मान्यवर यांनी श्री तुळजाभवानी मंदिरात देवीचे दर्शन घेतले आणि महाआरती केली. या वेळी देवीचे पुजारी श्री. अमित कदम यांनी देवीला हार आणि श्रीफळ अर्पण करून प्रार्थना केली. या वेळी मंदिरातील अनेक पुजारी उपस्थित होते.