खरे सुख (आनंद) देणारे सद्गुरु !
१. सद्गुरु केवळ दृष्टीक्षेपाने सत्शिष्याला देत असलेले सुख जगातील कुणीही देऊ न शकणे
‘ज्यांनी आत्मारामी ब्रह्मवेत्त्यांकडून दीक्षा घेतली आहे, त्यांना ठाऊक असते, ‘जगातील सर्व वैज्ञानिक, सत्ताधीश आणि सर्व धनवान् लोक मिळूनही एका माणसाला तितके सुख देऊ शकत नाही की, जे सुख सद्गुरु केवळ दृष्टीक्षेपाने सत्शिष्याला देऊ शकतात.
२. गुरु विषयसुख न देता ज्ञानाची अनुभूती देत असणे
ते सज्जन लोक की, जे सत्ताधीश आहेत किंवा शास्त्रज्ञ आहेत, ते सुविधा देऊ शकतात. गुरु कदाचित् या वस्तू देणारही नाहीत. सुविधांमुळे इंद्रियजन्य सुख मिळते. कुत्र्यालाही हलवा खाऊन मजा येते. ते इंद्रियजन्य सुख आहे; परंतु बुद्धीमध्ये ज्ञान भरल्यानंतर जी अनुभूती येते, ती काही निराळीच असते.
३. विषयसुख मनुष्य आणि पशु यांना सारखेच मिळणे
हलवा खाण्याचे सुख, तर विषयसुख आहे. विषयसुखात तर पशूंनाही मजा येते. साहेबाला सोफ्यावर (सुखासनावर) बसून जी मजा मिळते, तिच मजा डुकराला गटारीत मिळते. एका पतीला पत्नीपासून जी मजा मिळते, तीच मजा कुत्र्याला कुत्रीपासून मिळते.’
(साभार : ग्रंथ ‘सदा दिवाळी’)