Isro : इस्रो लवकरच मंगळ ग्रहावर यान उतरवणार !
बेंगळुरू (कर्नाटक) – भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् ‘इस्रो’ मंगळ ग्रहावर रोव्हर (एक प्रकारचे यान) आणि हेलिकॉप्टर उतरवणार आहे. आतापर्यंत केवळ अमेरिका आणि चीन यांनी हे साध्य केले आहे. या नवीन प्रकल्पाला ‘मंगळयान-२’ असे नाव देण्यात आले आहे.
इस्रो प्रगत अशा ‘स्काय क्रेन’द्वारे मंगळावर रोव्हरला उतरवणार आहे. नासाच्या ‘रोव्हर’ उतरवण्याच्या मोहिमेवरून ही प्रेरणा घेण्यात आली आहे. यामुळे आव्हानात्मक परिस्थितीतही सुरक्षित आणि अचूक लँडिंग सुनिश्चित होऊ शकेल