शरद पवार धर्मनिरपेक्ष नव्हेत, संधीसाधू आहेत ! – प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
मुंबई – शरद पवार यांना मी धर्मनिरपेक्ष मानत नाही. ते धर्मनिरपेक्ष असल्याचे खोटे सांगतात; परंतु मी त्यांना धर्मनिरपेक्ष मानत नाही. शरद पवार धर्मनिरपेक्ष नव्हेत, तर संधीसाधू आहेत, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केली.
या वेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘‘उद्धव ठाकरे हे धर्मवादी आहेत. उद्धव ठाकरे यांना भाजपमध्ये जाण्याविना पर्याय नाही. शरद पवार यांचीही मी शाश्वती देत नाही. उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोघेही भाजपमध्ये जातील. यात नाविन्य असे काहीच नाही. चौकशीच्या ससेमिर्यापासून वाचण्यासाठी त्यांना भाजपमध्ये जाणे भाग आहे.’’