ब्रह्मवेत्त्या संतांचा आदर होणार्‍या देशाला कोणतीही लाचारी रहात नाही !

‘ज्या देशात गुरु-शिष्य परंपरा आहे, ज्या देशात अशा ब्रह्मवेत्त्या संतांचा आदर होत असेल, जे संत आपले जीवन परोपकारासाठीच झिजवतात, ते आपल्या ‘मी’पणाला परमेश्वराशी एकरूप करतात. अशा देशात असे १०० पुरुष जरी असले, तर त्या देशाला मग कुणाचीही पर्वा रहात नाही. कोणतीही लाचारी रहात नाही. कोणताही त्रास होत नाही.’

(साभार : ग्रंथ ‘सदा दिवाळी’)