साधनेने प्रारब्धावरही मात होऊन आध्यात्मिक उन्नती होत असल्याने साधकांनी प्रारब्धाचा विचार करू नये !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन !
कु. शर्वरी कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे) : मागील ४ वर्षांपासून माझी आध्यात्मिक पातळी तेवढीच आहे. माझी आध्यात्मिक पातळी वाढली नाही. ‘माझे प्रयत्न अल्प होत आहेत’, असे मला पुष्कळ वाटते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : आपली साधना आपले प्रारब्धभोग भोगण्यासाठी वापरली जाते. समजा दोन व्यक्ती साधनेचे प्रयत्न करत असतील, यात ज्या व्यक्तीचे प्रारब्ध अधिक आहे, तिची आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी वेळ लागतो. हे उत्तर ठाऊक असले की, ‘आपण आपले साधनेचे प्रयत्न योग्य दिशेने होत आहेत कि नाहीत’, अशी काळजी करत नाही.