US Lecturing India On Human Rights : भारत त्याच्या लोकशाहीतील त्रुटी तेव्हाच सुधारेल, जेव्हा अमेरिकादेखील स्वतःच्या चुका मान्य करेल !
भारतीय वंशाचे अमेरिकी खासदार रो खन्ना यांनी अमेरिकेला दाखला आरसा !
वॉशिंग्टन (अमेरिका) – व्याख्याने ऐकण्याऐवजी भारत त्याच्या लोकशाहीतील त्रुटी तेव्हाच सुधारेल, जेव्हा अमेरिकादेखील स्वतःच्या चुका मान्य करेल. भारताशी चर्चा करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे, असे अमेरिकेतील भारतीय वंशाचे खासदार रो खन्ना यांनी अमेरिकेत ‘देसी डिसाइड्स’ नावाच्या परिषदेत केले.
खासदार रो खन्ना पुढे म्हणाले की, अमेरिकेने मानवाधिकारांच्या सूत्रावर भारताच्या नेतृत्वाशी चर्चा करावी. भारतात १५० वर्षे परकीय राजवट होती. त्यामुळे जेव्हा तुम्ही भारताला मानवाधिकारांवर व्याख्यान देता, तेव्हा ते तुमचे ऐकणार नाहीत. भारतीय वंशाचे आणखी एक खासदार बेरा यांनी खन्ना यांच्या मताशी सहमती दर्शवली. बेरा म्हणाले की, मी भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांशीही मानवाधिकाराच्या सूत्रावर बोललो होतो. ‘जर भारताने त्याची धर्मनिरपेक्ष प्रतिमा गमावली, तर उर्वरित जगासमोर भारताची ओळख नष्ट होईल’, असे मला भारताचे परराष्ट्रमंत्री म्हणाले होते. अमेरिकेकडे अजूनही चैतन्यशील लोकशाही आहे. आमचा विरोधी पक्ष आहे. आमचा वृत्तपत्र स्वातंत्र्यावर विश्वास आहे. या सगळ्या गोष्टी मला भारताच्या संदर्भात चिंतित करतात. मला आशा आहे की, भारताची लोकशाही टिकेल. (‘भारतातही स्वातंत्र्य असून त्याविषयी अमेरिकेतील खासदारांनी काळजी करून नये. त्यांनी अमेरिकेतील अश्वेत नागरिकांच्या स्वातंत्र्याची काळजी करावी’, असे भारताने ठणकावून सांगितले पाहिजे ! – संपादक)
India will correct its democratic mistakes, only when America also admits its own mistakes.
– Indian American Congressman, Ro Khanna.In regards to repetitive lecturing India on human rights by the US at the Desi Decides summit.
Senator Jayapal, another Indian American… pic.twitter.com/nGVmlRDtsp
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 17, 2024
संपादकीय भूमिकाअमेरिका भारताला भारतातील लोकशाहीत काय त्रुटी आहेत ?, हे सतत सांगत असते. त्यापेक्षा तिने स्वतःच्या देशातील त्रुटी दूर करण्याकडे लक्ष द्यायला हवे ! |
भारतीय वंशाचे खासदार जयपाल म्हणाले की, खासदार या नात्याने स्वतःवर आणि इतर देशांवर टीका करण्याचे धाडस असले पाहिजे. भारत हा अमेरिकेसाठी महत्त्वाचा आर्थिक भागीदार आहे; मात्र अमेरिकेने स्वतःच्या मूल्यांचाही विचार करायला हवा. जर अमेरिका चीनमधील उघूर मुसलमानांवर टीका करत असेल, तर तिने भारतात काय चालले आहे ?, तेही पहावे. मला ठाऊक आहे की, मी हे सर्व बोललो, तर मला वाईट म्हटले जाईल. तथापि मी जे चुकीचे असेल, त्यावर टीका करीन; कारण तसे न करणे, हे अमेरिकी मूल्यांच्या विरोधात असेल. (अमेरिकेतील अश्वेत नागरिकांच्या विरोधात काय चालले आहे ?, याविषयी जयपाल तोंड का उघडत नाहीत ? – संपादक) संपादकीय भूमिकाभारतात मुसलमान नाही, तर हिंदू असुरक्षित आहेत, हे वास्तव असतांना त्याकडे दुर्लक्ष करून हिंदूंनाच झोडपण्याची विद्वेषी मानसिकता भारतातील आणि विदेशातील भारतियांना लागली आहे, हेच यातून लक्षात येते ! |