सांगली लोकसभा निवडणुकीत रंग दाखवणार्यांचा विधानसभा निवडणुकीत बेरंग करू ! – संजयकाका पाटील, खासदार
सांगली – लोकसभा निवडणुकीत काहींनी शब्द देऊनही पाळला नाही. काहीजण बरोबर असल्याचे भासवत होते; मात्र त्यांनी विरोधात काम केले. त्यांची सर्व माहिती माझ्याकडे आहे. मी रडीचा डाव खेळणार नाही. मी लढणारा माणूस आहे. ज्यांनी निवडणुकीत रंग दाखवले, त्यांना विधानसभेला बेरंग करू’, अशी चेतावणी भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी १५ मे या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. संजयकाका पाटील पुढे म्हणाले की, जनता-जनार्दनाच्या आशीर्वादाने १ लाख मतांनी निवडून येईल. मला घमेंड, मस्ती नाही; मात्र काही लोक हळवे असतात. काळजी करत असतात. त्यांची काळजी मिटावी, असा उद्देश आहे.