मतदान करणार्‍यांना उपाहारगृहांमध्ये जेवणाच्या दरात २० टक्के सवलत !

मुंबई – मतदान केल्याची बोटावरील शाईची खूण दाखवल्यावर मुंबईतील १०० हून अधिक उपाहारगृहांमध्ये जेवणाच्या दरात २० टक्के सवलत देण्यात येणार आहे. २० आणि २१ मे हे २ दिवस ही सवलत देण्यात येणार आहे. ‘नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया’च्या मुंबई विभागाने ‘डेमोक्रसी डिस्काऊंट’ ही सवलतची घोषणा अधिकृतरित्या घोषित केली आहे. नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाच्या मुंबई विभागाच्या अध्यक्षा प्रमुख रेचल गोएंका याविषयी म्हणाल्या, ‘‘मुंबईने नेहमीच स्वत:चे दायित्व निभावले आहे. आमच्या संस्थेशी संलग्न अनेक रेस्टॉरंट ‘डेमोक्रसी डिस्काऊंट’ या मोहिमेत सहभागी झाले आहेत. नागरिकांना मतदान करण्याला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही ही मोहीम राबवत आहोत.’’