Jharkhand Minister Arrested : झारखंडच्या मंत्र्यांना बेहिशोबी संपत्तीच्या प्रकरणी अटक
रांची (झारखंड) – झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आलमगीर यांना अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) अटक केली. ‘ईडी’ने १५ मे या दिवशी १० घंट्यांंहून अधिक वेळ त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली. यापूर्वी आलमगीर यांचे खासगी सचिव संजीव लाल आणि त्यांचा नोकर जहांगीर आलम यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. जहांगीर आलम यांच्या घरातून ईडीने ३५ कोटी रुपयांची रोकड आणि काही दागिने जप्त केले होते. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. हा सगळा पैसा ग्रामीण भागातील रस्ते बांधणीच्या निविदांच्या बदल्यात दलालीमधून घेतल्याचा आरोप आलमगीर यांच्यावर आहे.
संपादकीय भूमिकाअशा भ्रष्टाचार्यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांची समाजात छीः थू होईल, अशी शिक्षा त्यांना केली पाहिजे ! |