वसई येथे गडावर विवाहापूर्वीची छायाचित्रे काढण्यास बंदी !
पुरातत्व विभागाचा निर्णय !
वसई (जि. पालघर) – येथील गडावर विवाहापूर्वीची छायाचित्रे काढणे (प्री-वेडिंग शूट) किंवा चित्रीकरण करणे यांवर बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भातील फलक पुरातत्व विभागाकडून लावण्यात आले आहेत. (फलकानुसार कृती होत आहे ना ? याकडेही पुरातत्व विभागाने लक्ष द्यायला हवे ! – संपादक) विवाहपूर्व छायाचित्रीकरणावर बंदी आणण्याची मागणी दुर्गप्रेमींनी अनेकदा केली होती.
येथे येणार्या पर्यटकांकडून वास्तूची हानी होत होती. गडावरील कोणत्याही वास्तूवर उभे राहून छायाचित्रे काढली जात होती. यामुळे ऐतिहासिक गडाची विटंबना होत होती.
संपादकीय भूमिका
|