अनधिकृत शाळांवर फौजदारी गुन्हे नोंद होणार !

प्रतिकात्मक चित्र

नवी मुंबई, १५ मे (वार्ता.) – नवी मुंबई महापालिका क्षेत्रात चालू असलेल्या अनधिकृत शाळांवर लवकरच फसवणुकीचे फौजदारी गुन्हे नोंद होणार आहेत. (अनधिकृत शाळा चालूच होऊ नयेत यासाठी उपाययोजना होणे आवश्यक ! – संपादक) राज्याच्या शिक्षण विभागाच्या आदेशानुसार महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांनी यासंदर्भात गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शिक्षण विभागाच्या माध्यमातून संबंधित पोलीस ठाण्यात या संदर्भात पत्र देण्यात आले आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त शिरीष आरदवाड यांनी दिली.