धाराशिवमध्ये पोलिसांच्या लाठीमाराच्या निषेधार्थ मराठा समाजाचे आंदोलन !
धाराशिव – छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमात पोलिसांनी लाठीमार केला. या घटनेच्या निषेधार्थ मराठा समाजाच्या आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील रस्त्यांवर टायर जाळले, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. यानंतर आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन निषेध नोंदवत जोरदार घोषणा दिल्या.
पोलीस अधिकार्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन ‘डीजे’वर (डॉल्बी ध्वनिक्षेपक यंत्रणेवर) लाठी मारून तो फोडण्याचा प्रयत्न केला. याचा निषेध म्हणून आम्ही छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती रस्त्यावर ठेवून शांततेत आंदोलन करत होतो. या वेळी राठोड साहेबांनी मूर्तीला हार आणि शाल अर्पण केला अन् थेट तेथील शिवभक्तांवर लाठीमार करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे संबंधित अधिकार्यांचे तात्काळ निलंबन करण्यात यावे.