मी तुमच्याकडे विकसित भारतासाठी आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
नाशिक – ‘सप्तश्रृंगीमाता आणि नाशिक येथील प्रभु रामचंद्र यांना मी नमन करतो. तुमची सेवा हेच माझे सर्वांत मोठे लक्ष्य आहे. गेल्या १० वर्षांत तुम्ही माझे काम पाहिले आहे. आता मी तुमच्याकडे तिसर्या कार्यकाळासाठी आणि विकसित भारतासाठी आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे’, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. १५ मे या दिवशी नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरी मतदार संघातील उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधानांच्या सभेचे जिल्ह्यातील पिंपळगाव येथे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. ‘जय शिवाजी’ असे म्हणत पंतप्रधानांनी भाषणाला प्रारंभ केला. काठी आणि घोंगडी देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. मोदी यांच्या आगमनाच्या वेळी मंत्री गिरीश महाजन यांनी ‘जय श्रीराम’ नावाचा जयघोष केला. ‘एका विशिष्ट समाजातील लोक ८० ते ९० टक्के मतदान करत आहेत. आपल्या समाजानेही अशाच प्रकारे मतदानाची टक्केवारी वाढवण्याची आवश्यकता आहे’, असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
पंतप्रधान म्हणाले की,…
१. काँग्रेसने अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठेच्या निमंत्रणाला धुडकावले होते. याच मार्गावर उद्धव ठाकरे यांची खोटी शिवेसना आहे. काँग्रेसचे लोक मंदिरावरून वेडेवाकडे काहीतरी बोलत असतात. .
२. वीर सावरकरांना शिव्या देणार्या काँग्रेसला डोक्यावर घेतले जात आहे. राज्यातील स्वाभिमानी जनता हे पहात आहे. राज्यातील लोकांचा राग वाढला आहे.