शिवरायांच्या अवमानाचा विचारही मनात येऊ शकत नाही ! – प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस
मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत अन् प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या आदर्शावर आणि लोककल्याणाच्या मार्गावरून चालण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. त्यांचा अपमान होईल, अशी कोणतीही गोष्ट मनात येऊ शकत नाही. यापुढे काळजी घेऊ, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रफुल्ल पटेल यांनी ‘एक्स’ खात्यावरून प्रसारित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघामध्ये १४ मे या दिवशी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधानांना छत्रपती शिवाजी महाराज घालत होते, त्याप्रमाणे जिरेटोप घालून त्यांचा सन्मान केला. यावरून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याची टीका विरोधकांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर केली होती.