बलात्कारी महंमद इस्माईल यास ३ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा
उडुपी (कर्नाटक) येथे अरबी भाषा शिकण्यासासाठी येणार्या लहान मुलीवर बलात्कार केल्याचे प्रकरण
उडुपी (कर्नाटक) – वर्षभरापूर्वी बालिकेवर लैंगिक अत्याचार करणार्या महंमद इस्माईल (वय ५४ वर्षे) याला जिल्हा न्यायालयाने ३ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली, तसेच ९ सहस्र रुपयांचा दंड ठोठावला. यातील ४ सहस्र रुपये पीडित मुलीला देण्यास सांगितले. याखेरीज न्यायालयाने पीडित बालिकेला हानीभरपाई म्हणून सरकारकडून २५ सहस्र रुपये देण्याचाही आदेश दिला.
मार्च २०२३ मध्ये शाळेला सुट्टी असतांना पीडित मुलगी, तिची लहान बहीण आणि भाऊ यांच्या समवेत इस्माईलच्या घरी अरबी भाषा शिकायला जात होती. त्या वेळी इस्माईलने पीडित मुलीला घरातील शयनकक्षात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले, तसेच याविषयी कुणालाही न सांगण्याची धमकी दिली. मुलीने घरी येऊन पालकांना याची माहिती दिल्यावर त्यांनी पोलिसांत तक्रार केल्यावर इस्माईलला अटक करण्यात आली होती.