Madhavi Raje Scindia : ग्वाल्हेर राजघराण्याच्या राजमाता माधवीराजे सिंधिया यांचे निधन !
नवी देहली – ग्वाल्हेर राजघराण्याच्या राजमाता तथा केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या आई माधवीराजे सिंधिया यांचे निधन झाले आहे. त्या ७० वर्षांच्या होत्या. माधवीराजे यांना ‘निमोनिया’ झाला होता. त्या गेल्या ३ महिन्यांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर येथील ‘एम्स’ रुग्णालयात उपचार चालू होते. काँग्रेसच दिवंगत नेते माधवराव सिंधिया यांच्या त्या पत्नी होत.
Madhaviraje Scindia, mother of Jyotiraditya Scindia, Central Minister and member of the Gwalior royal family passes away.
Madhaviraje was related to the royal family of Nepal.
She was the great-grand daughter of the Prime Minister of Nepal and Maharaja of Kaski and Lamjung,… pic.twitter.com/uudO7yXeBu
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 15, 2024
माधवीराजे यांचे माहेर नेपाळच्या राजघराण्याशी संबंधित होते. त्यांचे आजोबा जुद्ध समशेर बहाद्दुर हे नेपाळचे पंतप्रधान होते. माजी केंद्रीय मंत्री माधवराव सिंधिया यांचे वर्ष २००१ मध्ये विमान अपघातात निधन झाले.