सोलापूर येथे अश्लील छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन तरुणीवर अत्याचार !
सोलापूर- विवाहाचे आमीष दाखवून नंतर अश्लील छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देत एका तरुणीवर वारंवार अत्याचार करण्यात आला. वर्ष २०२० पासून हा अत्याचार चालू होता. यातून पीडित तरुणी गर्भवती राहिली आहे. पीडितेने आरोपीला विवाहाच्या संदर्भात विचारणा केली असता त्याने ‘मी आता लगेच विवाह करू शकत नाही, तुला काय करायचे आहे ते कर’, असे म्हणून निघून गेल्याचे तरुणीने विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मनोद्दिन मुल्ला (रहाणार नई जिंदगी, सोलापूर) याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदवला आहे. (वासनांध धर्मांधांच्या आमिषांना भुलून आपले आयुष्य उद्ध्वस्त करून घेऊ नका ! – संपादक)