कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात गौतम नवलखा यांना सर्वाेच्च न्यायालयाकडून जामीन संमत !
नवी देहली – सर्वाेच्च न्यायालयाकडून कोरेगाव भीमा प्रकरणाची सुनावणी चालू आहे. या वेळी या कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या प्रकरणी अटक करण्यात आलेले गौतम नवलखा यांना ४ वर्षांनंतर न्यायालयाकडून जामीन संमत करण्यात आला आहे.
या वेळी जामीन संमत करतांना न्यायालयाने सांगितले की, या प्रकरणाच्या सुनावणीसाठी काही वर्षे लागतील. घरात अटकेसाठी (हाऊस अरेस्ट) त्यांना २० लाख रुपयांचा खर्च द्यावा लागेल. उच्च न्यायालयाच्या जामीनाच्या आदेशावर स्थगितीचा अवधी वाढवण्यासाठी आम्हाला काही कारण लक्षात येत नाही. पूर्ण प्रकरणाची सुनावणी संपण्यासाठी काही वर्षे लागतील. न्यायमूर्ती एम्.एम्. सुंदरेश आणि न्यायमूर्ती एस्.व्ही.एन्. भट्टी यांच्या खंडपिठापुढे ही जामीनविषयक सुनावणी झाली.
वर्ष २०१७ मध्ये पुण्यात एल्गार परिषदेत भडकाऊ भाषण देण्याचा नवलखा यांच्यावर आरोप आहे. त्यानंतर कोरेगाव भीमा येथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला होता.