‘संतांचे आशीर्वाद मिळण्यासाठी भौतिक (स्थुलातील) सीमांची मर्यादा नसते’, याची अनुभूती घेणारे एक साधक !

एखादी व्यक्ती सहस्रो मैल दूर अंतरावर असली, तरी ‘संतांच्या मनात त्या व्यक्तीबद्दल आलेला विचार त्या व्यक्तीवर कसे आध्यात्मिक स्तरावरील उपाय करू शकतो ?’, याची एका साधकाला आलेली अनुभूती पुढे दिली आहे.

सद्गुरु नंदकुमार जाधव

१. सकाळी उठल्यावर निराशाजनक, नकारात्मक विचार नाहीसे होऊन मन निर्विचार असल्याचे जाणवणे

‘एरव्ही माझा दिवस सहसा निरुत्साही, नकारात्मक आणि निराशाजनक विचारांनी आरंभ होतो. गेल्या आठवड्यात एका दिवशी सकाळी मी उठल्यावर माझ्या मनात एकही विचार नव्हता, तसेच माझ्या मनातून नकारात्मक विचार पूर्णपणे नाहीसे झाले होते आणि मला आनंद जाणवत होता. ‘आनंदाची ही स्थिती मी कशी काय अनुभवत आहे ?’, याचे मला दिवसभर आश्चर्य वाटत होते.

२. सद्गुरु नंदकुमार जाधव घरी आल्यावर त्यांना साधकाच्या आईने त्याच्या प्रयत्नांविषयी सांगणे आणि आनंदाची स्थिती अनुभवता येण्यामागचे नेमके कारण लक्षात येणे

दुसर्‍या दिवशी मला आईचा दूरभाष आला. ती म्हणाली, ‘‘मला जळगाव सेवाकेंद्रत ३ ते ४ दिवस एका संतांसाठी स्वयंपाक बनवण्याची सेवा मिळाली आहे. तसेच सद्गुरु नंदकुमार जाधवकाका जळगाव येथे आपल्या घरी आले होते.’’ आई असेही म्हणाली की, तिने सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांना आमच्याविषयी थोडक्यात सांगून आम्हा सर्वांच्या साधनेच्या प्रयत्नांविषयी सांगितले. हे ऐकल्यावर ‘मला आनंदाची स्थिती अनुभवता येण्यामागे नेमके काय कारण आहे ?’, हे माझ्या लक्षात आले.

३. संतांच्या मनात केवळ १ – २ मिनिटांसाठी विचार आल्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय होऊन आनंदाची अनुभूती येणे

‘संतांचे आशीर्वाद मिळण्यासाठी भौतिक (स्थुलातील) सीमांची मर्यादा नसते’, हे मला या अनुभूतीतून शिकायला मिळाले. ‘चार सहस्रांहून अधिक मैल दूर असलेल्या संतांच्या मनात आपल्याविषयी केवळ १ – २ मिनिटांसाठी विचार येणे आणि त्यामुळे आपल्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय होऊन आपल्याला आनंदाची अनुभूती येणे’, ही एक अभूतपूर्ण अनुभूती आहे.

ही अनुभूती दिल्याबद्दल प.पू. डॉक्टर (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले) यांच्या चरणी कृतज्ञता !’

– एक साधक, इंग्लंड (२०.३.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक