Chinese Soldier Nepal Border: नेपाळ सीमेवर पकडलेला चिनी नागरिक निघाला चीनचा सैनिक !
उत्तरप्रदेशातील शहरांची गोळा केली होती माहिती !
सिद्धार्थनगर (उत्तरप्रदेश) – भारत-नेपाळ यांच्यातील लिलादिहवा सीमेवर पकडलेला चिनी नागरिक युफे नागो हा तेथील गुप्तहेर आहे. तो चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’शी संबंधित असल्याचे पोलिसांच्या अन्वेषणात समोर आले आहे. अनेक दिवस सिद्धार्थनगर, महराजगंज, बहराईच आणि अयोध्या या शहरांची माहिती त्याने गोळा केली होती. स्थानिक पोलिसांनी त्याच्या केलेल्या चौकशीत मिळालेली माहिती गुप्तचर विभाग आणि आतंकवादविरोधी पथक यांना दिली आहे. त्यानंतर या दोन्ही यंत्रणांचे पथक येथे पोचले आहेत.
संपादकीय भूमिकापाकिस्तानीच नाही, तर चिनीही भारतात हेरगिरी करत आहेत, हे लक्षात घ्या ! |