Rajasthan Love Jihad : मुसलमान तरुणाने हिंदु असल्याचे भासवून हिंदु तरुणीवर केला बलात्कार
राजस्थानमध्ये लव्ह जिहादचे प्रकरण उजेडात !
जयपूर (राजस्थान) – येथील शिप्रापथ भागात लव्ह जिहादचे प्रकरण समोर आले आहे. जयपूरमध्ये मोबाईल दुरुस्तीचे दुकान चालवणार्या सलमान खान नावाच्या मुसलमान तरुणाने स्वतः हिंदु असल्याचे भासवून एका २५ वर्षीय पीडित हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर त्या मुसलमान तरुणाने हिंदु तरुणीवर बलात्कार केला. पीडित महिला ही सांगानेर येथील रहिवासी असून तिच्या कुटुंबियांनी शिप्रापथ पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
आरोपी सलमान खानने पीडित तरूणीवर बलात्कार केला आणि तिची अश्लील व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल करून तिच्याकडून ४ लाख रुपये उकळले. हा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देऊन आरोपीने पीडितेला तिच्या इच्छेविरुद्ध देहलीला नेले, असे या तक्रारी म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचे अन्वेषण चालू करून देहलीतून आरोपी सलमान खानला अटक केली आणि पीडित तरुणीला तिच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.