Kerala Ice-Cream Bomb Blast : कन्नूर (केरळ) येथे पोलीस ठाण्यापासून काही मीटर अंतरावर २ आईस्क्रीम बॉम्बचा स्फोट
(टीप : आईस्क्रीम बॉम्ब म्हणजे बॉलच्या आकाराचा आईस्क्रीम कंटेनर वापरून बनवलेले एक प्रकारचे स्फोटक)
कन्नूर (केरळ) – कन्नूरच्या परियाराम येथे १३ मे या दिवशी २ आईस्क्रीम बॉम्बचा स्फोट झाला. बॉम्ब फेकणार्यांचा शोध चालू आहे. येथील एका मंदिरात भाविकांनी केलेल्या अर्पणाच्या सूत्रावरून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) आणि भाजप यांच्यामध्ये चालू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
या बॉम्बस्फोटांनंतर परिसरात तणाव निर्माण झाला आहे. पोलीस ठाण्यापासून काही मीटर अंतरावर हे स्फोट झाले आहेत. या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा चालू केली आहे.
संपादकीय भूमिकाकेरळमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा ! केंद्र सरकारने आता केरळमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे, असेच जनतेला वाटते ! |